मावळ तालुक्यात २०१ विवाह सोहळ्याचे आयोजन



लोणावळा  (टाईमन्युजलाईन नेटवर्क )  मावळ तालुका सामुदायिक विवाह सोहळा समिती आणि मावळ  प्रबोधिनी  यांचे तर्फे २०१ विवाह सोहळ्याचे २४ एप्रिल  रोजी   कान्हेफाटा येथे आयोजन करण्यात आले आहे.

           मावळ तालुका वारकरी सांप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली हा  विक्रमी विवाह  सोहळा कान्हे फाटा येथे होणार असल्याचे मावळ प्रबोधिनी चे संस्थापक  रविंद्र आप्पा भेगडे यांनी टाईमन्युजलाईन नेटवर्क प्रतिनिधीशी बोलताना  सांगितले .

      सुमारे सव्वा लाख वर्हाडी मंडळीची बैठक व्यवस्था  ,१ लाख लोकांची  भोजन व्यवस्था , वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था , नियोजनात ५हजार स्वयंसेवकांचा सक्रीय सहभाग .

 विवाह मुहूर्तावर संपन्न होतील. प्रथमोचारासाठी अँब्युलन्सची व्ववस्था . सुरक्षेसाठी सीसीटीव्ही  कँमेरे  आग्निशामक व्यवस्था .

 वधू वरांस प्रत्येकी  तीन पोशाख / साड्या.

संसारोपयोगी भांडी .

नवीन शेगडीसह गँस कनेक्शन . साखरपुडा व हळदी समारंभाची व्यवस्था ,  हार, मुंडावळ्या , बाशिंग अक्षतांची व्यवस्था  हिंदू धर्मशास्ञानुसार धार्मिक विधी. ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक. अशी विवाह सोहळ्याची वैशिष्ट्ये आहेत.

         लकीड्राँ पध्दतीने भाग्यवान जोडप्यास १ मारूती सुझूकी आल्टो कार, तीन देशी गायी आणि सहा लँपटॉप भेट देण्यात येणार आहे.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget