पवार कुटूंबाचे वर्चस्व असलेल्या संस्थांचे कर्मचारी प्रचारात


खासदार श्रीरंग बारणे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

पिंपरी,(टाईमन्युजलाईन नेटवर्क) - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) या तिन्ही संस्थांमधील कर्मचारी व शिक्षकांना मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या कामाला जुंपण्यात आले असून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी लेखी मागणी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांबरोबरच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, पुणे व रायगडचे जिल्हाधिकारी तसेच पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना खासदार बारणे यांनी यापूर्वीही याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतरही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने बारणे यांनी पुन्हा तक्रार केली आहे.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget