नक्षलवाद्यांच्या चकमकीत चार जवान शहीद




कांकेर (टाईमन्युजलाईन नेटवर्क):
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान शहीद झाले आहेत तर दोन जवान जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील परतारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महला गावाजवळ ही चकमक झाली.

बीएसएफची ११४वी बटालियन गस्तीसाठी निघाल्यानंतर काही वेळातच नक्षलवाद्यांनी या बटालियनला लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी अगदी जवळून जवानांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला बीएसएफ जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. काहीवेळ दोन्ही बाजूने गोळीबार झाला मात्र नंतर नक्षलवादी तिथून फरार झाले.

गोळीबारात चार जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यातील महला गावाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरक्षाबलांकडून नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला लक्ष्य करण्यासाठी आजचा हल्ला घडवून आणण्यात आल्याचे सुरक्षायंत्रणांचे म्हणणे असून कांकेर लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget