दोन सख्‍ख्‍या भावंडांचा बुडून मृत्‍यू




अलिबाग (टाईम न्युजलाईन नेटवर्क):



अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील दगडखाणीलगत असलेल्या पाण्याच्या डबक्यात दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. कार्तिक कृष्णा सुरवसे (10), तर गणेश कृष्णा सुरवसे (5) वर्ष अशी त्‍यांची नावे आहेत.


नुकतीच पडलेली सुट्टी आणि त्यातच अंगाची लाही लाही करून सोडणाऱ्या ऊन्‍हापासून सुटका करून घेण्‍यासाठी ही दोन्ही भावंड पोहण्यासाठी मापगाव येथील दगडखाणीत असलेल्या डबक्यात गेले होते. मात्र या दोन्ही भावंडाना या डबक्याची उंची व पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही भावांचा त्या पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. अलिबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget