मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन विचित्र अपघात



लोणावळा (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी दुर्घटना टळली. ट्रकची अपघातग्रस्त खाजगी बस आणि बचाव कार्यातील रुग्णवाहिनीला धडक दिली. प्रवाश्यांना सुरक्षित स्थळी हलविल्याने  मोठी हानी टळली. घटनास्थळी प्रवाशी भयभीत झाले होते.
पहाटे सव्वा सहा वाजता खाजगी बसने अज्ञात वाहनाला मागून धडक दिली होती. यात काही प्रवासी जखमी होते, त्या जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. बचावकार्य सुरू असतानाच मागून आलेल्या ट्रकने अपघातग्रस्त बस आणि रुग्णवाहिकेला  जोराची धडक दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक चालक झोपेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली
 तत्पूर्वी याच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आणखी एक अपघात झाला होता. पिकअपने कंटेनरला मागून धडक दिली, त्यात दोन जखमी झालेत. ओझर्डे गावच्या हद्दीत पुण्याला येताना पहाटे सहाच्या सुमारासची घटना घडली.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget