मुळशीत 45 ग्रामपंचायत आरक्षण सोडतीवर हरकतचा पाऊस:हिंजवडी पहिला,घोटावडे मारुंजी 2 व 3 नंबरी


मुळशी,, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): मुळशीत 45 ग्रामपंचायतच्या 2020 निवडणूक आरक्षण सोडतीवर हरकती अखेरच्या दिवशी शुक्रवारी पौड तहसील कचेरीच्या निवडणूक विभागात आल्या आहेत. चर्चेत आघाडीवर असलेल्या हिंजवडीचा हरकतीतही पहिला नंबर असून 7 हरकत अर्ज आले आहेत. घोटावडे, मारुंजी 2 व 3 नंबरवर आहे.  निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिकेवर नाराजी व्यक्त झाली आहे. ठरवून व लोकांची मागणी धुडकावून स्वयंघोषित आकडेवारी संशयास्पद असल्याची भूमिका व नाराजी गावोगावीच्या लोकांनी व्यक्त केली.
 घोटावडेत 6 व मारुंजीत 3 जणांनी हरकत अर्ज दिले आहेत. माण, कासारआंबोली, अंबडवेट इथूनही 3 हरकत अर्ज तहसील कचेरीत दिले गेलेत. जांबे इथून 2, भोईनी, अकोले, दखणे, चाले, हाडशी या गावातील आरक्षण कार्यक्रमावरही ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवले आहेत. हिंजवडीत दत्तात्रय ढमाले, सुनीता वाघमारे, सतीश मराठे, सचिन जांभुळकर, चंद्रकांत जांभुळकर,  संदीप साखरे, मयूर साखरे, गणेश जांभुळकर यांनी हरकत घेतली. मारुंजीत अंकुश राजाराम जगताप, गणपत जगताप, कपिल बुचडे यांनी वेगवेगळे 3 आक्षेप अर्ज दाखल केले आहेत. माण गावातून राज बहिरट, रवी बोडके, निखिल बोडके यांनी आक्षेप नोंदविला आहे. घोटावडे येथून किरण शेळके, राजेंद्र शिंदे, नितीन गोडांबे, रामदास लांडगे, संदीप खाणेकर, नथू मातेरे यांनी विरोध दर्शविला आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget