पत्नीला आय लव्ह यु चा संदेश पाठवला म्हणून स्केटिंग प्रशिक्षकाची हत्या


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)

पत्नीला आय लव्ह यु चा संदेश पाठवला म्हणून स्केटिंग प्रशिक्षकाची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. पुण्याच्या मारुंजीत बुधवारच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. 
विठ्ठल मानमोडे (वय 32) असं आरोपीचे तर निलेश नाईक (वय 24) असं प्रशिक्षकाचे नाव होते. निलेश पुण्यातील गोखलेनगर येथे स्केटिंगचे प्रशिक्षण द्यायचा. निलेश सुसगाव येथील ज्या सोसायटीत राहतो तिथंच विठ्ठल ही राहायला असल्याने त्यांची मैत्री झाली होती. निलेशचं विठ्ठलच्या घरी येणं-जाणं व्हायचं. याच ओळखीतून विठ्ठलच्या पत्नीचा निलेशकडे नंबर ही आला होता. याच दरम्यान विठ्ठलवर चतुरशृंगी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला. पोलीस त्याच्या मागावर असल्याने तो काही दिवस बाहेर अन काही दिवस घरी असायचा. अशातच एकट्या पडलेल्या विठ्ठलच्या पत्नीला निलेशने प्रेमाच्या जाळ्यात घेण्याचा इरादा केला आणि आय लव्ह यु चा मेसेज पाठवला. ही बाब विठ्ठलला समजली अन त्याने निलेशचा काटा काढण्याचं ठरवले. यासाठी मंगळवारी रात्री विठ्ठलने पार्टीचा बेत आखला. निलेश आणि एका साथीदाराला घेऊन तो मारुंजी येथील निर्जनस्थळी आला. तिथंच तिघे रात्रभर दारू प्यायले नशेत असतानाच सोबत आणलेल्या कोयत्याने साथीदाराच्या मदतीने विठ्ठल मानमोडेने निलेशचा गळा कापला. हिंजवडी पोलिसांनी विठ्ठलला नवी मुंबई येथून अटक केली, तर साथीदार अद्याप ही फरार आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget