खासदार बारणे यांनी काढलेल्या भव्य पदयात्रेला पिंपरी कॅम्पात प्रचंड प्रतिसाद

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी विधानसभेचे शिवसेना उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पायी फिरून पिंपरी कॅम्प ढवळून काढला.
     आज सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी येथील डिलक्स चौकातून पदयात्रेला सुरूवात झाली. खासदार श्रीरंग बारणे, महायुतीचे उमेदवार व आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, विभागप्रमुख अनिल पारचा, भाजपाचे पिंपरी विधानसभा मुख्य संयोजक राजू दुर्गे, नंदू भोगले, माधव मुळे, गणेश आहेर, खंडू शिरसाट, अनिस अत्तार, विष्णु साळवी, श्यामा शिंदे, लच्छु बुलानी, हाजी दस्तगीर मनियार, जितू मंगतानी, सावला तोतानी, रोमी संधू, बबलू सोनकर, गोपाळ खत्री, विभागप्रमुख प्रशांत तायडे, नितीन घोलप आदींसह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते.
     डिलक्स चौकातून ही पदयात्रा बी ब्लॉक, रिव्हर रोड, शगून चौक, साई चौक, वैष्णोदेवी मंदीर, आयप्पा मंदीर मार्गे जायका चौकात पदयात्रेची सांगता झाली.
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget