अजित पवार राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही बँक बरखास्त केली-दानवे


वडगाव मावळ (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)

अजित पवार राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही बँक बरखास्त केली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून बँक घोटाळा केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. वडगाव मावळ येथे विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
दानवे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य सहकारी बँक बरखास्त केली, तेव्हा अजित पवार बँकेचे संचालक होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच संगनमताने ही बँक बरखास्त केली. या बँकेच्यामार्फत तुम्ही १३ कारखान्यांना १ हजार कोटींपेक्षा अधिक कर्जांचे वाटत केले. ते कारखानेही दिवाळीखोरीत निघाले आणि त्यानंतर या कारखान्यांना ज्यांनी दिवाळखोरीत काढले त्यांनीच ते विकत घेतले. तसेच या बँकांना पुन्हा कर्ज का देण्यात आलं?, असा सवालही त्यांनी यावेळी केला
शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत, यावर भाष्य करताना दानवे म्हणाले, ईडीने ७० लोकांवर केसेस दाखल केल्या आहेत.  निवडणुका जवळ आल्याचा हा परिणाम आहे. आम्हाला सध्या जनतेचा जो प्रतिसाद मिळतो आहे ते पाहता भाजपाचे नेते असा सूड उगवत आहेत. मात्र, हे गुन्हे आज दाखल होत नाहीएत आधीचेच आहेत, अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांच्या आरोपांना उत्तर दिले.
दानवे पुढे म्हणतात, “मी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आता तुमच्यापुढे दोनच पर्याय शिल्लक आहेत. निम्म्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांचा मार्ग निवडू देणे आणि तुम्ही जेलमध्ये जाणे. आमच्या नावाने बोंबलून उपयोग नाही, सत्तेत असताना तुम्ही कार्यकर्त्याना चांगलं वागवलं नाहीत. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती अशी झाली आहे की, तिथली माणसं श्रीमंत आहेत. पण पक्ष गरीब झाले आहेत, कोणी कोणाकडे पाहायला तयार नाही.

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget