पिंपरी चौकात राष्ट्रवादीने रास्ता रोको

पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क)
शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने आंदोलन करण्यात येत आहे. पिंपरी चौकात राष्ट्रवादीने रास्ता रोको
केला आहे. रस्त्याच्या मध्येच कार्यकर्त्यांनी ठाण मांडले होते  भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर मंगला कदम, नगरसेविका शीतल काटे, उषा वाघेरे, वैशाली घोडेकर, अनुराधा गोफणे, माजी विरोक्षी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक मयूर कलाटे, राहूल भोसले, प्रवीण भालेकर, प्रभाकर वाघेरे, अतुल शितोळे, , विजय लोखंडे, आनंदा यादव, कविता खराडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने कारवाई केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget