19 निवेदन दिली तरी पाणीप्रश्न नाही सुटला:नगरसेवकांचे बेमुदत उपोषण


पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क)
वाकड, पिंपळेनिलख, विशालनगर परिसरातील पाणी टंचाईच्या टंचाई गंभीर होत चालली आहे.महापालिका दुर्लक्ष करीत आहे 19 निवेदन देवून ही दखल घेतली जात नाही याचा निषेधार्थ सत्ताधारी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी सोमवारी महापालिकेच्या समोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.  ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत स्वपक्षीय नगरसेवकाच्या आंदोलनामुळे सत्ताधारी भाजपला घराचा आहेर दिला आहे
महापालिकेच्या समोर सकाळपासून नगरसेवक कामठे यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांसह उपोषण सुरु केले आहे. पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असताना नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. पिंपळेनिलख परिसरात केवळ दहा ते वीस मिनिटे पाणी येते. पुरेशा पाण्याअभावी नागरिकांची ससेहोलपट होत असताना प्रशासन आपल्याच कारभारात दंग आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 19 निवेदने दिली. आंदोलन केले. तरी, देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, असा आरोपही नगरसेवक तुषार कामठे यांनी केला असून भाजपला घराचा आहेर दिला.
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget